Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»मान्सून 30-31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता
    महाराष्ट्र

    मान्सून 30-31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

    महाराष्ट्रात 5 ते 7 जूनदरम्यान आगमन : उत्तर महाराष्ट्रात आज...
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 24, 2026No Comments353 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी यंदाच्या मान्सूनबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. काठमांडू येथून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ते 31 मे दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात 5 ते 7 जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होऊ शकते.

    पंजाब डख यांनी सांगितले की, आजपासून साधारण 12 दिवसांनी मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतीची तयारी वेगाने सुरू करावी. नांगरणी, मशागत, बियाणे व खतांची उपलब्धता याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

    दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पूर्व-मोसमी पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. 24 आणि 25 मे दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण पट्ट्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके, जनावरे आणि शेतीमाल सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

    अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, खरीप हंगामासाठी सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

    #farmers #maharashtra Konkan Monsoon North Maharashtra punjabrao dakh Rain Weather
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif