Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»आला रे आला..! मॉन्सून केरळमध्ये आला..!
    हवामान

    आला रे आला..! मॉन्सून केरळमध्ये आला..!

    मॉन्सून दाखल होताच राज्यात थेट ‘हा’ इशारा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 4, 2026Updated:June 4, 2026No Comments465 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला. केरळमध्ये मॉन्सून 3 दिवस उशिराने दाखल झाला. याबाबत बोलताना प्रवीण कुमार वैज्ञानिक हवामान विभाग यांनी म्हटले की, मॉन्सून केरळमध्ये आलाय. दक्षिण महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात मान्सून दाखल होईल. विदर्भात 15 जून नंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

    पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण असलं तरी सध्या असच तापमान कायम असेल, 40 ते 42 डिग्री पर्यंत उन्हाचा पारा असेल. विदर्भात पुढील काही दिवस वादळीवाऱ्याचा मध्यमस्वरूपाचा पाऊस होईल. मात्र, आता येणारा पाऊस हा अवकाळीच असेल कारण मान्सूनच्या अनुषंगाने अजून विदर्भात अनुकुल वातावरण निर्माण व्हायचे आहे.

    विदर्भासह राज्यात 15 जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होईल. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्यम स्वरूपाच पाऊस आणि वादळी वारा असणार आहे. पण अवकाळी पाऊस असेल, हा मान्सून पूर्व पाऊस नसेल. विदर्भाला मान्सूनसाठी अजून प्रतिक्षा कायम असणार आहे… मात्र 10 जून नंतर परिस्थितीच्या अनुषंगाने याचा अंदाज घेता येईल.

    विदर्भातील काही जिल्ह्यांत येत्या 24 तासात काही ठिकाणी वादळासह तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशपासून विदर्भ होत रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंजावत तयार झाला आहे. याच्या प्रभावाने येत्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यात विजा आणि वादळासह तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

    या काळात तापमानात चढ-उतार होणार असून उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी विदर्भाच्या बहुतेक शहरात तापमान वाढ नोंदविण्यात आली असून ब्रह्मपुरीत राज्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया आणि वर्धा येथे 1 ते 2 अंशाची वाढ होऊन तापमान 41 ते 42 अंशावर गेले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif