Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»सावधान मोमोज फॅक्ट्रीच्या फ्रिजमध्ये कुत्र्याचे शीर (व्हिडीओ)
    ब्रेकिंग

    सावधान मोमोज फॅक्ट्रीच्या फ्रिजमध्ये कुत्र्याचे शीर (व्हिडीओ)

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 18, 2025Updated:March 19, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तुम्हीही मोमोज आणि स्प्रिंग रोल खात असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. एका मोमोज कारखान्यावर छापा टाकला असता तिथे कुजलेल्या भाज्या, बुरशी लागलेली कोबी आणि खराब झालेले तेल यांपासून मोमोज बनवले जात होते. एवढेच नाही तर मोमोजच्या मसाल्यातही किडे सापडल्याचे समोर आले आहे. यासोबतच फ्रीजमध्ये एका प्राण्याचे छिन्नविछिन्न शीर सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याशिवाय कारखान्यातील भांड्यांमध्ये काही प्रमाणात मांसही सापडले असून ते पोलिसांनी जप्त केले आहे.

    सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा हा व्हिडीओ पंजाबमधील मोहाली येथील आहे. या भागातील एका कारखान्यातून बाहेर पडणारा कचरा पाहून लोकांना संशय आला. आत जाऊन पाहिलं तर परिस्थिती अतिशय भयावह होती. घाणीत मोमोज आणि स्प्रिंग रोल बनवले जात होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे.

    या कारखान्यात वापरण्यात येणारी कोबी पूर्णपणे खराब झाली होती. तिला बुरशी लागली होती. भांडी वॉशरूममध्ये ठेवली होती आणि वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरले जात होते. गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात तयार होणारे मोमो आणि स्प्रिंग रोल शहरभरातील गाड्या आणि दुकानांना पुरवले जात होते. या संशयास्पद हालचालींची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. जप्त करण्यात आलेल्या डोक्याची ओळख पटवण्यासाठी ते पशुवैद्यकीय विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

    https://www.instagram.com/reel/DHYF2BjgMc7/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

    ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभाग सतर्क झाले आहेत. कारखान्यात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांचीही चाचपणी केली जात आहे. पोलिसांनी कारख्यान्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच कारखाना मालक व इतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

     

    Momos
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

    August 1, 2026

    मुक्ताईनगरात ट्रकमधून 340 लिटर डिझेल चोरी

    July 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif