महिलेच्या घरात घुसून विनयभंग करून मारहाण; संशयित अटकेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात मध्यरात्री अनधिकृतपणे प्रवेश करत विनयभंग करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केले आहे.

जळगाव शहरातील एका भागात ३२ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसोबत राहते. त्या खासगी कंपनीत नोकरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव हा महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत दरवाजा ठोठावला. महिला दरवाजा उघडून बाहेर आल्या असता मंगलसिंग याने तिचा हात पकडला व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.

यावेळी महिलेने त्याला ढकलल्याचा राग आल्याने मंगलसिंग जाधव याने महिलेला लाथ मारून पळ काढला. दरम्यान महिलेच्या जेठाने संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला आता त्यांनाही ढकलून पसार झाला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय बडगुजर, सतीश गरजे यांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.