Thursday, February 2, 2023

सुनेसमोर सासूचा विनयभंग; तीन जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

किरकोळ कारणावरून तालुक्यातील तारखेडा (Tarkheda) येथे सुनेसमोर सासुचा विनयभंग (molestation) केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात (Pachora Police Station) गुन्हा (Crime) नोंदविण्यात आला आहे.

१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व फिर्यादीची सासु शेतातील मका पिकास पाणी देत असतांना जितेंद्र रविंद्र चव्हाण हा शेतात येऊन विहीरीवरील पाण्याची मोटर बंद करत फिर्यादी व फिर्यादीची सासु यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करत दगड मारुन जखमी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दगड मारल्याने फिर्यादीची सासु यांचे तीन दात पडले. तसेच फिर्यादीच्या सासूच्या मनाला लज्जा वाटेल असे वक्तव्य व कृत्य केले. घटनास्थळी रामदास नथ्थु चव्हाण व निर्मला रामदास चव्हाण हे येवुन फिर्यादी व फिर्यादीची सासु यांचे मोबाईल हिसकावून घेतला.

- Advertisement -

पिडीतेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र कौतिक चव्हाण, रामदास नथ्थु चव्हाण व निर्मला रामदास चव्हाण या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे