आधीच्या सरकारने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले !

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल : धुळ्यातून प्रचाराचा श्रीगणेशा

0

धुळे, लोकशाही न्युज नेटवर्क 

आधीच्या काँग्रेस सरकारने महाराष्ट्र आणि जनतेला लुटण्याचे काम केले असून त्यांच्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटला होता असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज दि. 8 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पहिली सभा झाली. अनेक दशकापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी होती. परंतु काँग्रेसने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा वर्षानुवर्ष सत्तेवर असलेल्या दिला नाही. काँग्रेसला आता धक्का बसला आहे. मोदी यांनी हे काम कसे केले, हा प्रश्न त्यांना पडला आहे. महाराष्ट्रमधील डबल इंजिन सरकार जोरदार काम करत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथे घेतलेल्या सभेत सांगितले.

मी महाराष्ट्रात वाढवण बंदराचे उद्घाटन नुकतेच केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मी त्यावेळी काही बोललो नाही. मात्र आता ज्या दिवशी महायुती सरकारचा शपथविधी होईल, त्यानंतर आम्ही राज्यसरकारसोबत बैठक घेऊ. त्या बैठकीत वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबद्धल चर्चा होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

महाविकास आघाडीच्या गाडीत चाक नाही, ब्रेक नाही. त्यांच्यात चालकांच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे होत आहेत. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने आधी सरकारला लुटले. त्यानंतर विकास कामे थांबवली. त्यांनी मेट्रोची काम रोखून ठेवली. समृद्धी महामार्गाचे काम थांबवले. त्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विकासाची प्रत्येक योजना थांबवली. त्यानंतर राज्यात महायुतीची सरकार बनली. त्यानंतर अडीच वर्षांत विकास चौफर झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास भरभरुन झाला आहे. आता महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात ठेवा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.

 

महिलांना जास्त अधिकार दिले

महायुतीने वचननामा जाहीर केला आहे. त्यांच्या दहा वचनांची चर्चा होत आहे. हा वचननामा जनतेच्या सूचनांमधून तयार झाला आहे. महायुतीचा वचननामा विकसित भारताचा आधार बनणार आहे. आमच्या बहिणींचे जीवन विकसित महाराष्ट्र, विकसित भारतासाठी चांगले बनवणे गरजेचे आहे. महिला पुढे जातील तर संपूर्ण समाज प्रगती करेल. त्यामुळे केंद्र सरकारने मागील 10 वर्षांत महिलांना केंद्रात ठेऊन काम केले. आम्ही सर्व दरवाजे महिलांसाठी उघडले. त्यांना अधिकार दिले. महाराष्ट्रामधील महायुती सरकार केंद्राच्या पावलापाऊल ठेवून काम करत आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा देशभरात पाहायला मिळत आहे. ही योजना काँग्रेस बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते कोर्टात पोहचले आहे. त्यांची सत्ता आली तर सर्वप्रथम ही योजना ते बंद करतील? असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

 

फडणवीसांकडून शेतकऱ्यांना शब्द

गेल्या 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वात जे काम झाले, त्यामुळे पुढच्या पाच वर्षात धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एक जिल्हा होणार आहे. आज आपण पाहतोय, ज्या प्रकारे सुलवाडे-जामफळच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या प्रत्येक शेतीला पाणी जात. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलय. अक्कलपाडा धरणाची उंची वाढवून त्याठिकाणी धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई भासणार नाही अशी काम होत आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदींच्या नेतृत्वाखाली मनमाड-इंदूर रेल्वेसेवेच्या माध्यमातून एक अशा प्रकारच सेंटर धुळ्यामधे तयार होते आहे. मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर, धुळे-मनमाड रेल्वे या सगळ्याचा एकत्रित विचार केला, तर इंडस्ट्रीज लॉजिस्टिक सेंटर कुठले असेल, तर धुळे जिल्हा असेल. मोदींनी सहा राष्ट्रीय महामार्ग धुळ्याला दिले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

वोट जिहादमुळे पराभव

एकीकडे आम्ही विकास करत आहोत. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन महाराष्ट्र पुढे नेत आहोत. दुसरीकडे आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही, म्हणून आमच्या विरोधकांनी रणनिती आखली आहे. धुळ्यात ते वोट जिहाद करतायत. आम्ही लोकसभेला धुळ्यात एक लाख 90 हजार मतांनी पाचही मतदारसंघात पुढे होतो. मात्र वोट जिहादमुळे मालेगाव सेंट्रल आणि धुळ्यातील 4 हजार मतांनी पराभव झाला. आता जागे झालो नाही, तर नेहमीसाठी झोपावे लागेल. ही निवडणूक जागं होण्याची आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.