Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»पुढील पाच दिवस राज्यात मध्यम ते हलका पाऊस
    हवामान

    पुढील पाच दिवस राज्यात मध्यम ते हलका पाऊस

    मात्र ‘या’ भागात पूर आणि पाणी साचण्याचा गंभीर धोका
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 18, 2026No Comments337 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहे. खासकरून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच आता हवामान विभागाकडून पावसाबाबतचा नवा अंदाज समोर आला आहे. या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

    हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 दिवसांत राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. 5 दिवसांच्या कालावधीनंतरही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

    नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, पुढील चार ते पाच दिवस विदर्भात पावसाची स्थिती सामान्य राहणार असल्याचा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 1 जूनपासून आजपर्यंत नागपूर शहरात सरासरीच्या तुलनेत 25 टक्के कमी पावसाची नोंद तर विदर्भात 18 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.

    एल निनोचा प्रभाव पावसावर दिसून येत आहे. बनत असलेली हवामान प्रणाली कमजोर ठरत आहे त्यामुळे पाऊस कमी होत आहे. हवामान विभागाने 18 ऑगस्ट रोजी देशातील अनेक भागांमध्ये जोरदार वादळ, पाऊस आणि पुराचा इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो.

    दरम्यान झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि पाणी साचण्याचा गंभीर धोका हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याशिवाय उत्तर भारतातील दिल्ली, लखनऊ, शिमला आणि देहराडून यांसारख्या प्रमुख शहरांसह 7 पेक्षा अधिक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif