तरुणावर चाकूचा वार करून मोबाईल लांबविला; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मानराज पार्कजवळ पायी जाणाऱ्या तरूणावर अज्ञात दोन जणांनी चाकूने वार करून जखमी करत हातातील मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अविनाश राजेंद्र सोनवणे (वय २४, रा. बांभोरी ता. धरणगाव जि.जळगाव) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. अविनाश सोनवणे हा आपल्या कुटुंबियासह बांभोरी येथे वास्तव्याला आहे. शहरातील मानराजपार्क समोरील नवजीवन शुपर शॉपच्या बाजूला राहणारे सुशिल साळुंखे यांच्याकडे वाहनचालक म्हणून नोकरीला आहे.

१४ फेब्रुवारी रोजी अनिवाश दिवसभर ट्रीप करून सायंकाळी मालकाकडे रात्री १०.३० वाहन लावले आणि घरी जाण्यासाठी पायी निघाले. त्यावेळी मानराज पार्कजवळील दिलासा व्यसनमुक्ती केंद्रासमोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोनजण दुचाकीने आले. हातातील मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसवल्याने अविनाश यांनी मागे बसलेल्या तरूणाला लागलीच पकडले. यातील एकाने चाकू काढून अविनाश यांच्यावर वार करून जखमी करून दोघे दुचाकीवरून पसार झाले.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.