मोबाईलवर खूप जाहिराती येतात ? मग हे बदल लगेच करून घ्या…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सध्याचे जग खूप ऍडव्हान्स आहे. त्यामुळे कोणा कडेही वेळ नसतो. आधी कुठलीही गोष्ट लागली कि बाजारात अथवा दुकानात जाऊन खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट मुळे सर्व काही सहज उपलब्ध झाले आहे. मात्र असे असले तरी, एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर आपण अनेकदा स्मार्टफोनवर गुगलवरुन चर्च  करतो. मात्र त्यानंतर अनेकदा या प्रोडक्टबद्दलच्या जाहिराती तुम्हाला मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून, सोशल नेटवर्किंगवर आणि इतर ठिकाणी दिसू लागतात. आणि अनेकदा या जिहाराती फारच त्रासदायक ठरतात. अगदी महत्त्वाचं काही शोधायचं असतानाही या जाहिराती स्क्रीनचा व्ह्यू ब्लॉक करतात आणि आपली चिडचीड होते. विशेषतः अ‍ॅण्ड्रॉइड फोन युझर्सला याचा फार त्रास सहन करावा लागतो.

पण या जाहिराती नेमक्या कशा थांबवायच्या हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी गुगलची सर्च हिस्ट्रीही क्लियर करून काहीही उपयोग नाही. मोबाईलवर दिसणाऱ्या जाहिराती अगदी सोप्या पद्धतीने थांबवता येतात. पण हे कसं करायचं ?

 

जाहिराती थांबवण्यासाठी ही पद्धत वापर…

 

  • फोनच्या सेटिंग (Settings) पर्यायामध्ये जा. तेथे गुगल पर्याय निवडा.

 

  • त्यानंतर ‘मॅनेज युआर अकाऊंट’ (Manage your google account) पर्यायावर क्लिक करा.
  • युआर अकाऊंटच्या मेन्यूमध्ये ‘डेटा अ‍ॅण्ड प्रायव्हसी’ (Data & Privacy) हा पर्याय मिळेल.

 

  • डेटा अ‍ॅण्ड प्रायव्हसीच्या मेन्यूमध्ये तळाशी ‘पर्सनलाइज्ड अ‍ॅड्स’ (Personalized Ads) हा पर्याय दिसेल. डेटा अ‍ॅण्ड प्रायव्हसीच्या मेन्यूमध्ये युझर्सच्या कोण कोणत्या अ‍ॅक्टीव्हीटी ट्रॅक केल्या जातात याची यादी दिसेल.
  • ‘पर्सनलाइज्ड अ‍ॅड्स’च्या खाली ‘माय अ‍ॅड सेंटर’ (My Ad Center) हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यास तुम्हाला ‘पर्सनलाइज्ड अ‍ॅड्स’ सुरु ठेवायच्या आहेत की बंद यासंदर्भातील पर्याय दिसेल. ही सेटींग तुम्हाला ऑफ (OFF) करावी लागेल.

 

  • त्यानंतर सेटिंगवर (Settings) जाऊन गुगल पर्याय निवडावा. त्यामध्ये ‘डिलीट अ‍ॅडव्हर्टायझिंग आयडी’ (Delete Advertising ID) हा पर्यायावर टॅप करुन डिलीट करा. यानंतर तुम्हाला सातत्याने पॉपअप होणाऱ्या कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.