दरवाजा उघडा ठेवल्याचा गैरफायदा; कामगारांच्या खोलीतून दोन मोबाईल चोरी

0

दरवाजा उघडा ठेवल्याचा गैरफायदा; कामगारांच्या खोलीतून दोन मोबाईल चोरी

जळगाव – उकाडा रणरणत्या उन्हामुळे असह्य झाल्याने दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या कामगारांच्या खोलीत चोरट्यांनी प्रवेश करून दोन मोबाईल फोन लांबवले. ही घटना २० एप्रिल रोजी साईनगर, जळगाव येथे घडली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनगर परिसरातील एका खोलीत औद्योगिक वसाहतीत काम करणारे चार कामगार राहतात. सध्या वाढत्या तापमानामुळे खोलीत उकाडा वाढल्याने कामगारांनी पहाटे दरवाजा उघडा ठेवला होता. याचा फायदा घेत चोरट्यांनी खोलीत प्रवेश करून प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले.

झोपेतून उठल्यावर चोरीची बाब लक्षात आल्यानंतर रामेश्वर गबरू पवार (वय २५, रा. साईनगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.