जळगावात दोन ठिकाणी मोबाईल चोरी, गुन्हे दाखल
जळगाव : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना घडल्या असून दोन्ही प्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२७ सप्टेंबर रोजी नवीन बसस्थानक परिसरातून मंगेश बिरारी (४०, रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा) यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविला. त्याच दिवशी आदर्शनगर भागातून प्रीती शशिकांत पाटील (२४, रा. आदर्शनगर) हिचा मोबाईलही चोरट्यांनी चोरला.
या दोन वेगळ्या चोरीप्रकरणी जिल्हापेठ व रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


