Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मनसेच्या शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र!
    ताज्या बातम्या

    मनसेच्या शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 17, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का बसला आहे. शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

    मुंबई, ठाणे, केडीएमसीसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेय. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीला ठाणे अन् मुंबई इतकेच महत्त्व प्राप्त झालेय. कारण, गेल्या काही दिवसांपासून कल्याण आणि डोंबिवलीमध्ये राजकीय घडमोडी अन् फोडाफोडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता राज ठाकरेंच्या मनसेलाही कल्याणमध्ये जोरदार धक्का बसलाय. राजू पाटील यांचे विश्वासू कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी कस्तुरी देसाई यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय.

    मनसेचे कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी मनसेचा आज राजीनामा दिला. माजी आमदार राजू पाटील यांचे समर्थक मनसे शरह अध्यक्ष कौस्तुभ देसाई,मनसेच्या माजी नगेसेविका कस्तुरी देसाई यांनी आज पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. दोन दिवसांत ते पुढील रणनिती ठरणार असल्याचे समजतेय. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी देसाई दाम्पत्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. पण आता त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा विचार केला आहे. पुढील दोन दिवसांत ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

    कौस्तुभ देसाई यांचं कल्याणमध्ये मोठं प्रस्थ आहे. त्यांचा मतदारांसोबत थेट संपर्क असल्याने मनसेच्या वाढीसाठी फायदा होत होता. विधानसभेत राजू पाटील यांच्या प्रचारात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. राजू पाटील यांचे विश्वासू म्हणून देसाई यांची ओळख होती. पण त्यांनी मनसेला आता जय महाराष्ट्र केला आहे. देसाई यांनी रामराम ठोकल्याचा फटका मनसेला बसणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असतानाच हुकमी एक्क्याने राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीत याचा मनसेला फटका बसू शकतो. या घडामोडीमुळे कल्याण शहरातील मनसेच्या संघटनात्मक बांधणीला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

    माजी आमदार राजू पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कौस्तुभ देसाई हे मनसेचे शहर अध्यक्ष होते. तर कस्तुरी देसाई यांनी मनसेकडून नगरसेविका म्हणून काम केले होते. दोघांनीही पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत राजीनामा दिल्याने मनसेच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कौस्तुभ देसाई व कस्तुरी देसाई यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतरही त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

    राजीनाम्यानंतर बोलताना देसाई दांपत्याने पुढील राजकीय रणनिती दोन दिवसांत जाहीर केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, की स्वतंत्र भूमिका घेणार, याकडे कल्याणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसेकडून या राजीनाम्यांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

    राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलेय. आयोगाने सोमवारी राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली. कल्याण डोंबिवलीसह राज्यातील २९ महापालिकेसाठी १५ जानेवारी २०२५ रोजी मतदान होईल. तर १६ जानेवारी राजी मतमोजणी असेल. २५ तारखेपासून उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरूवात होईल.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif