Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»15 लाख रिक्षाचालक संपाबाबत मनसे आक्रमक
    महाराष्ट्र

    15 लाख रिक्षाचालक संपाबाबत मनसे आक्रमक

    भैय्या लोकांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्याची वेळ आली
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 24, 2026No Comments214 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांना ग्राहकांशी मराठीत बोलावं लागेल. येत्या 1 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयावर मोठा वादही सुरु झाला आहे. शिवसेनेतूनच संजय निरुपम या सक्तीच्या विरोधात आहेत. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या 1 मे पासून रद्द करण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. या मराठी सक्तीच्या विरोधात येत्या 4 मे पासून 15 लाख रिक्षाचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा रिक्षा, टॅक्सी चालकांवर मराठी सक्तीच्या बाजूने मैदानात उतरली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.

    “ज्या पद्धतीने मुंबईला बंद पाडण्याची धमकी देत देत आहेत, धमकी देणाऱ्या भैय्याला धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मुंबई आमच्याशिवाय चालूच शकत नाही अशांना धडा शिकवा. स्थानिक भाषा येत नसताना देखील यांना लायसन्स दिली कोणी? अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. “10-12 शब्द कशाला, पूर्ण मराठी भाषा येणं गरजेचं आहे. राज्यात काम करताना पैसे कमावता, इकडे पोट भरता, मग भाषा का नाही येत?” असं संदीप देशपांडे यांनी विचारलं आहे.

    “आमच्या राज्यात यायला भाषेची गरज आहे. यूपीमध्ये मराठी भाषा शिकवली पाहिजे. भविष्यात आपल्या राज्यावर संकट येऊ शकतं. संजय निरुपम हा अतिशय टुकार माणूस आहे. एवढ करून देखील भैय्या लोक त्याला मतदान करत नाहीत. तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा. या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिली.

    “भाजपचा रडीचा डाव आहे, महिला बिल आणताय ना? मग महिलेचा संताप सहन करायला शिका” अशी टीका भाजपच्या जनआक्रोश मोर्चावर त्यांनी केली.” लोढा कट्टर मराठी विरोधी आहे. मुंबईने मंगल प्रभात लोढाला एवढ मोठं केलं, तोच कट्टर मराठी द्वेषी आहे. मागेच म्हटलं होतं, मुंबई महापालिका भूखंडाचे श्रीखंड करत आहे. केईएम आणि एकलव्यचा काय संबंध? आमच्या मनोज चव्हाण यांनी पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच नाव द्यावं अशी मागणी केली आहे ती योग्य आहे” असं संदीप देशपांडे म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif