‘आता कसं वाटतंय, पेराल तेच उगवेल’- मनसे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

“आता कसं वाटतंय बरं बरं वाटतंय, कारण पेराल तेच उगवेल” असे कॅप्शन लिहीत मनसेने शिवसेनेला जोरदार टोमणा मारलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सक्रिय झाले असून संपूर्ण राज्यभरात अमित ठाकरे यांचा महासंवाद दौरा सुरू झालेला आहे. आज शनिवारी कल्याण डोंबिवलीत राजपूत्र अमित यांचे आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीत चौका चौकात बॅनर लावण्यात आले. या बॅनरच्या माध्यमातून मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला.

अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी तसेच कल्याण डोंबिवलीत मनसे सज्ज झालेली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील म्हणाले की, मनसेची ताकद काय असते हे शक्तीप्रदर्शन करून आम्ही दाखवू. या दौऱ्याच्या माध्यमातून अमित ठाकरे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.