Saturday, October 1, 2022

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुखासह 5 अटकेत

- Advertisement -

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुण्यात (Pune) रात्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला (Uday Samant Attack) झाला. याप्रकरणी पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे (Shiv Sena city chief Sanjay More) यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

15 जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिंदे गट असा राडा झाला. शिवसैनिकांनी शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाड्यांवर हल्ला केला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची सभा कात्रजमध्ये सुरू असताना तिथून सामंत यांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता. सिग्नलला सामंतांची गाडी उभी असताना, शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांवर हल्ला करुन गाडीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी सामंत यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक

पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली. मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनाही अटक करण्यात आलीय. त्यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रूपेश पवार यांना अटक करण्यात आलीय. त्याशिवाय 15 जणांना गुन्हा दाखल करण्यात आलाय.

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला

याप्रकरणी शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांची पहिली अटक झाली. दरम्यान, मोरे यांनी ट्विट करत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, असे म्हटले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पुण्यात दणदणीत, खणखणीत सभा पार पडली. म्हणून सरकारने शिवसैनिकांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे, असे ट्विट शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केले आहे.

तसेच आमच्यावर गंभीर आरोप करुन गजानन थरकुडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर, सुरज लोखंडे, चंदन साळुंखे , विशाल धनवडे, अनिकेत घुले, रुपेश पवार आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यावर भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली.

शिवसैनिक विरुद्ध शिंदे गट राडा 

पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिंदे गट असा राडा झाला होता. शिवसैनिकांनी शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाड्यांवर हल्ला केला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Youth Sena chief Aditya Thackeray) यांची सभा कात्रजमध्ये सुरु असताना तिथून सामंत यांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता. सिग्नलला सामंतांची गाडी उभी असताना, शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांवर हल्ला करुन गाडीच्या काचा फोडल्या.

ही मर्दुमकी नाही

दरम्यान, उदय सामंतांवर हल्ला करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. ते म्हणाले, भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. ‘दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही’. चिथावणी देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले होते.

काळ ह्याला उत्तर आहे

याप्रकरणी उदय सामंत (MLA Udya Samant) यांनी देखील ट्विट केले आहे. “गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩” असे ट्विट त्यांनी केलं आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या