Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»विधानमंडळात आ. राजूमामांचा प्रलंबित प्रश्नांवर आवाज!
    राजकारण

    विधानमंडळात आ. राजूमामांचा प्रलंबित प्रश्नांवर आवाज!

    गाळेधारक, फेरीवाले धोरण, मनपा नोकरभरतीवर चर्चा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 2, 2026No Comments98 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्य विधिमंडळाच्या द्वितीय पावसाळी अधिवेशनामध्ये आज गुरुवारी आमदार राजूमामा भोळे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे जळगाव शहराशी निगडित अत्यंत महत्त्वाचे व जनहिताचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे उपस्थित केले.

    यामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील 2368 गाळेधारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न, फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, तसेच जळगाव महानगरपालिका मधील रिक्त पदे तातडीने भरण्याचा प्रश्न सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.

    आमदार राजूमामा भोळे यांनी सभागृहात सांगितले की, जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील 2368 गाळेधारकांचा प्रश्न सन 2012 पासून रेडीरेकनर दर निश्चितीमुळे प्रलंबित आहे. हा प्रश्न हजारो व्यापाऱ्यांच्या उपजीविकेशी संबंधित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी मनपाने आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. नगरविकास विभागानेही त्यानुसार कार्यवाही करण्यास सांगितले असतानाही महानगरपालिकेकडून अद्याप प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला नसल्याने गाळेधारकांचा प्रश्न रखडला असल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली. मनपाने तातडीने प्रस्ताव शासनाकडे सादर करून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी केली.

    जळगाव शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक व लघु व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण, नोंदणी तसेच स्वतंत्र व्हेंडिंग झोन विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याने त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्यामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे, असे नमूद करत या सर्व रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्याची शासनाकडे मागणी केली.

    ‌‘‌‘
    शहरातील व्यापारी, फेरीवाले, हातगाडीधारक, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. नागरिकांच्या हिताच्या प्रश्नाला प्राधान्य देणे गरजेचे असून सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. शासनस्तरावरुन त्वरीत कार्यवाही होईल ही अपेक्षा आहे.

    – आ. राजूमामा भोळे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif