Thursday, September 29, 2022

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा: आ. राजूमामा भोळे

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राज्य सरकारने आता पेट्रोल – डिझेलवरील ‘व्हॅट ‘ कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा आ. सुरेश भोळे महानगर, अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी आज भाजपातर्फे आज दिनांक २९ मार्च रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

आ. राजूमामा भोळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजी वरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे हे दुर्दैवी आहे. गेली दीड वर्षे पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे . मात्र या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २१ रोजी पेट्रोल – डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ व १० रुपयांची कपात केली. त्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यांसह एकूण २५ राज्य सरकारांनी पेट्रोल डीझेल वरील मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला दिलासा दिला. मात्र महाराष्ट्राने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट अजूनही कमी केलेला नाही.

पेट्रोल , डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासही महाराष्ट्राने विरोध केला आहे. आता तरी आघाडी सरकारने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा असे आ. राजूमामा भोळे व दिपक सुर्यवंशी यांनी नमूद केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या