Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आमदार मंगेशदादा चव्हाण : विकासाचा ध्यास, जनतेशी नाते असलेला जनसेवक!
    ताज्या बातम्या

    आमदार मंगेशदादा चव्हाण : विकासाचा ध्यास, जनतेशी नाते असलेला जनसेवक!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 25, 2026No Comments85 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : राजकारणात पद मिळवणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच त्या पदाच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांना न्याय देणेही महत्त्वाचे असते. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची आणि मतदारसंघातील प्रश्न शासनदरबारी मांडण्याची भूमिका त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येते.
    आमदार म्हणून विधानसभेत बोलताना त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी, वीज, पाणी, रस्ते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रश्न सातत्याने मांडले आहेत. वेळोवेळी त्यांनी विधानसभा चर्चेदरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, शेतीसाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले होते. तालुक्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक अडचणी किंवा अतिवृष्टीसारख्या संकटांच्या वेळी त्यांनी घेतलेली धाव आणि प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी केलेला पाठपुरावा विशेषत्वाने अधोरेखित झाला आहे. केवळ निधी मंजूर करून न थांबता प्रत्यक्ष कामाच्या दर्जावर लक्ष ठेवण्याची त्यांची पद्धत स्थानिक नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करते.

    विकासकामांचा ध्यास, पाठपुरावा मंत्रालयापर्यंत
    ‌‘आमदार म्हणजे जनतेचा सेवक‌’ ही भूमिका मांडत विकासकामे, शासकीय योजना आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे हे आपले कर्तव्य असल्याचे चव्हाण यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. विकासकामांसाठी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करावा लागतो आणि एखाद्या कामासाठी अधिकाऱ्यांसमोर तासन्‌‍‍तास बसावे लागले तरी आपण मागे हटत नाही, अशी त्यांची भूमिका असते. अलीकडेच चाळीसगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू व्हावे यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. या मागणीला प्रशासकीयदृष्ट्या महत्त्व असून, चाळीसगाव परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसाठी अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या व्यापक दृष्टिकोनातून हा विषय पुढे नेला जात असल्याचे दिसते.

    नव्या अपेक्षा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो; तो आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्याची आणि पुढील वाटचालीसाठी नव्या अपेक्षा व्यक्त करण्याची संधीही असते. चाळीसगाव मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. शेती, सिंचन, रोजगार, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासकीय सुविधा या प्रत्येक क्षेत्रात आणखी ठोस कामांची गरज आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावच्या जनतेकडून, सहकाऱ्यांकडून आणि राजकीय वर्तुळातून त्यांना हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव मतदारसंघाने विकासाची नवी भरारी घेतली आहे आणि भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास असाच सुरू राहो, हीच सदिच्छा!

    आमदार मंगेशदादा चव्हाण आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

    September 15, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif