Sunday, November 27, 2022

ब्रेकिंग.. आमदार मंगेश चव्हाणांचे फेसबुक अकाऊंट हॅक

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

चाळीसगाव (Chalisgaon) येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक (Facebook account hack) झाल्याचे उघडकीस आली आहे. तसेच अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेला धमकी देणारा बदनामीकारक फोटो अपलोड केला. याप्रकरणी जळगाव (Jalgaon) सायबर पोलिसात (Cyber Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

गोपाल शिवाजी म्हस्के (रा.टाकळी प्र.चा. ता. चाळीसगाव) यांनी याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याअनुषंगाने २६ ते २८ सप्टेंबरच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मिडीयावरील फेसबुक अकाऊंट “Mangesh Chavan” व फेसबुक पेज “Mangesh Chavan-मंगेश चव्हाण” हे हॅक केले.

दरम्यान प्रोफाईल फोटो बदलून त्यावर काळा बुरखा (कपडा लपटलेला) चेहरा व हातात चाकु घेतलेले व्यक्तीचा धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत. तसेच Mangesh Chavan- मंगेश चव्हाण या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडीट कार्डमधून ओ.टी.पी. न घेता ७० हजार ८०० रुपये काढून आर्थिक फसवणुक केली.

याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाभर कानडे हे करीत आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या