Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटी अनुदान मंजूर
    कृषी

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटी अनुदान मंजूर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 11, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पाचोरा, भडगाव – सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनातर्फे पाचोरा भडगाव मतदार संघातील ८६७३३ शेतकर्‍यांना सुमारे १०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केली असुन लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर हा निधी पडणार आहे. येणारा गुढी पाडवा हा या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांंना गोड जाणार असल्याची माहीती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    शिवसेना कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपाचे मधुकर काटे, सभापदी गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, किशोर बारवकर, सुनिल पाटील, गंगाराम पाटील, राजेंद्र पाटील, प्रविण ब्राम्हणे, संजय सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटील म्हणाले की, राज्यातय आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमानुसार, पाचोरा तालुक्यातील ५१ हजार ६६. ७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ५२ हजार ३६४ शेतकऱ्यांना एकूण ६९ कोटी ४५ लाख २२ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तर भडगाव तालुक्यातील २२ हजार १००. १५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ३४ हजार ३६९ शेतकऱ्यांना एकूण ३० कोटी ५ लाख ६२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

    शेतकर्‍यांना हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी. बी. टी. पोर्टलद्वारे वितरित केले जाणार आहे. यासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शेतकऱ्यांची बँकनिहाय व आधार क्रमांकानुसार यादी तयार करत आहेत. अनुदान मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी “आपले सरकार” केंद्रात जाऊन तत्काळ ई – केवायसी करावी, जेणेकरून निधी त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल. शासनाने शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला असून सर्व लाभार्थ्यांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच तात्कालीन माजी मुख्यमंञी एकनाथ शिंदे, माजी दोन्ही उपमुख्यमंञी व जिल्ह्याचे माजी मंत्री अनिल पाटील यांचे आभारही आमदार किशोर पाटील यांनी मानले.

    MLA Kishor Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif