पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असुन नुकतीच निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी शहरातील सिंधी काॅलनी येथील दसरा मैदानावर भव्य असे शक्ती प्रदर्शन करत १५ ते २० हजार जनसमुदायाच्या उपस्थितीत भव्य रॅली काढणार आहेत.
पाचोरा शहरातील वरखेडी रोडवरील दसरा मैदानापासुन भारत डेअरी स्टाॅप, कृष्णापुरी, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आ. किशोर पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
याबाबतची माहिती आज आ. किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, प्रविण ब्राह्मणे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.