Wednesday, August 10, 2022

गिरीश महाजनांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

गिरीश महाजनांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेरमध्ये भाजपनं गुरुवारी मोर्चा काढला होता. या मोर्च्याच्या आयोजनामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

आमदार गिरीश महाजन यांच्या 11 जणांविरोधात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांच्यासह भाजपाचे नेते, तालुकाध्यक्ष आणि विधानसभा प्रमुख यांच्यासह एकूण 11 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आधीच दिला होता. ओमिक्रॉनमुळे राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णसंख्येची वाढ ही चिंताजनक ठरु लागल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत होतं. त्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ही जमावबंदी झुगारत मोर्चा काढण्यानं गिरीश महाजनांसह 11 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, आधीही जळगावात मोर्चा काढल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. फक्त गिरीश महाजनच नव्हे तर त्यांच्यासह तब्बल 125 जणांविरोधात जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमावबंदीचं पालन न केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन केलं होतं. त्यामुळे तेव्हाही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी नियमित वीज पुरवठ्यापासून वंचित राहत असल्यानं सरकारचा निषेध करण्यासाठी गिरीश महाजन आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी भाजप कार्यकर्त्यांची एक बैठकही बोलवण्यात आली होती. या बैठकीचीही जळगावात चांगलीच चर्चा रंगली होती. जामनेर इथल्या पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हजर राहिलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रम आटोपल्यावर गिरीश महाजन यांच्या घरी हजेरी लावली होती. या भेटीनंही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशातच दुसरीकडे आता गिरीश महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचं पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गुन्हादेखील दाखल झाला आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या