minecraft free redeem gift code or prepaid card glade candle coupons printable august 2013 boston market printable coupons june 2015 pizza hut triple treat box coupon do itunes gift cards work mac app store
Monday, December 5, 2022

तर… चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे… आमदार गायकवाडांची धमकी…

- Advertisement -

 

- Advertisement -

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; 

- Advertisement -

- Advertisement -

शनिवारी बुलढाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. “एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे” अशी धमकी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

संजय गायकवाड यांनी सांगितलं की, ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नेते पातळी सोडून बोलत आहेत. पण त्यांना माहिती नाही की शिवसेनेच्या संजय गायकवाडांचे कार्यकर्ते किती भयानक आहेत. ते आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देतात पण ते आता जर शिंदे विरोधात बोलले तर आम्ही त्यांना चुन चुनके आणि गिन गिनके मारेंगे.” असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे.

दरम्यान, शनिवारी बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला होता. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांमध्ये आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे. १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक करत लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. या प्रकरणात आता दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या