आ. अनिल पाटलांच्या खांद्यावर तीन जिल्ह्यांची जबाबदारी…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर विधिमंडळातील मुख्य प्रतोद पदाची महत्वाची जवाबदारी असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी सर्व निवडणुकांच्या दृष्टीने अजून एक भार त्यांच्या खांद्यावर देत जळगाव धुळे आणि नंदुरबार अश्या तीन जिल्ह्यांची जवाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. संघटना बांधणी, निवडणूक नियोजन आणि बूथ यंत्रणा सक्षमीकरण अशी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सदरची नियुक्ती केली असून, जवाबदारी खांद्यावर येताच आमदार पाटील कामाला देखील लागले आहेत. पहिल्या टप्प्यात बूथ कमिटी बांधणी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने तिन्ही जिल्ह्याचे म्हणजेच खान्देश विभागाचे बूथ प्रमुख ते असणार आहेत. आगामी सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळावे यासाठी पक्षाची संघटना बूथ पातळीपर्यंत मजबूत करणे आवश्यक आहे, त्यासाठी बूथ बांधणी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आगामी दोन महिन्यात तिन्ही जिल्ह्यात बूथ बांधणी त्यांना करावी लागणार आहे. त्यादृष्टीने तिन्ही जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने बैठका घेऊन योग्य ते नियोजन करणार आहेत.

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर आलेली मोठी जवाबदारी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.