अमळनेर शहरातून २ मुलांसह विवाहिता बेपत्ता
अमळनेर प्रतिनिधी शहरातील ढेकू रोड परिसरात लग्नासाठी आलेली ३० वर्षीय विवाहिता आपल्या दोन मुलांसह रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून याबाबतची तक्रार अमळनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
ढेकू रोड भागात नातेवाईकांच्या लग्नासाठी ही महिला चंद्रपूरहून आली होती. तिच्यासोबत ८ वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी होती. दिनांक 23 रोजी लग्नाच्या दिवशी ती “मुलांसह जाऊन येते” असे सांगून घरातून बाहेर पडली; परंतु बराच वेळ उलटूनही ती लग्नस्थळी पोहोचली नाही. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला, मात्र कुठेही तिचा मागमूस लागला नाही.
शोध व्यर्थ ठरल्याने महिलेच्या भावाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. दोघांसह विवाहिता बेपत्ता असल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास हे.कॉ. विनोद भोई करीत आहेत.