Saturday, January 28, 2023

२८ वर्षीय तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील शिवाजी नगर जवळ असलेल्या गेंदालाल मिल परिसरातून २८ वर्षीय तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. विजय शंकर लोखंडे (वय २८, रा. गेंदालाल मिल, शिवाजी नगर, जळगाव) असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

विजय लोखंडे हा आपल्या कुटुंबियांसह गेंदालाल मिल परिसरात वास्तव्याला आहे. शनिवार २५ जून रोजी सकाळी ११ वाजता विजय हा घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. सायंकाळी घरी न आल्याने त्याच्या आईसह कुटुंबियांनी परिसरात नातेवाईक व मित्र मंडळी यांच्याकडे तपास केला असता तो कुठेही आढळून आला नाही.

- Advertisement -

दरम्यान विजयची आई सुमन लोखंडे यांनी सोमवारी २७ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार गौतम केदार करीत आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे