Tuesday, August 9, 2022

बापच निघाला नराधम; पोटची मुलगी अत्याचारातून गरोदर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बाप लेकीच्या नात्याला काळिमा लावणारी संतापजनक घटना उघडकीस आलीय. सावत्र आई बाळंतपणासाठी माहेरी गेल्याची संधी साधून नराधम बापाने पोटच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी नराधम बापावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील एका तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सावत्र आई, वडील, आजी, आजोबा आणि लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. सहा महिन्यापुर्वी पिडीत मुलीची सावत्र आई ही गर्भवती असल्याने ती तिच्या माहेरी गेलेली होती. तर पिडीत मुलीचे आजी व आजोबा हे नगर येथे डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी गावाला गेले होते. त्यावेळी घरी पिडीत मुलगी, तिचा लहान भाऊ आणि तिचे वडील हे तिघे घरीच होते.

एके दिवशी रात्री तिघांनी जेवण केल्यानंतर झोपले होते. त्यावेळी पिडीता झोपलेली असतांना बापाने तिचे तोंड दाबून अत्याचार केला. हा प्रकार त्याने तीन ते चार वेळा केला. दरम्यान, पिडीत मुलीची आजी घरी आल्यावर हा प्रकार सांगितला. त्यावेळी पिडीते मुलीच्या आजीने नराधम बापावर घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. गेल्या महिन्यात पिडीत मुलीला मासिक पाळी आली नाही म्हणून तिची आजी ही पिडीतेला घेवून पाचोरा येथील खासगी रूग्णालयात घेवून गेली असता ती गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

या घटनेनंतर पिडीत मुलीला घेवून तिच्या आजीने जळगाव गाठले, त्यानंतर हा प्रकार जिल्हापेठ पोलीसांना रविवार ३ जुलै रोजी कळल्यानंतर त्यांनी धाव घेतली. बालकल्याण समितीचे पत्र आणि पिडीत मुलीच्या जबाबावरून सरकारी फिर्यादी म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर यांच्या फिर्यादीवरून नराधम बापावर सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या