Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मंत्री शंभूराज देसाईंना मारहाण प्रकरण तापले!
    महाराष्ट्र

    मंत्री शंभूराज देसाईंना मारहाण प्रकरण तापले!

    शिवसेना व भाजपात वादाची ठिणगी? : विधानभवनात...
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 23, 2026No Comments369 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रकरणात मंत्री शुभंराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचे आज विधासभेत पडसाद उमटले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानभवनाच्या पाऱ्यावर आंदोलन केलं. पायऱ्यांवरील आंदोलनावरुन मुख्यमंत्री संतापल्याचं दिसत आहे. सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभुराज देसाई यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री चिडल्याचे देहबोलीवरून दिसत आहे. मागील बाकावर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटीलही आहेत. ”उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    “खोतकर व देसाई यांनी जी परिस्थिती मांडली. त्याचा मी देखील साक्षीदार आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरु झाली तेव्हा शंभूराज देसाई यांनी सांगितले. दोन मतदारांवर जुना गुन्हा एक दिवस आधी दाखल केला. त्यांना अटक करणार असल्याचे सांगितले. मी पोलीस अधिक्षकांना कॉल केला. नंतर अटक करून असं ते म्हणाले. मी हा सांगितले, मतदानापासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही. एसपी म्हणाले असे होणार नाही. मी पोलीस महासंचालक यांच्यासोबत बोललो. डीजी म्हणाले मी कॉल केला आहे व मतदानापासून वंचित ठेवणार नाही” अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

    “खोतकर यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ही वस्तुस्थिती आहे. मी पक्षाचा प्रतोद व उपनेता आहे. त्या निवडणुकीत व्हीप बजावण्याचा अधिकार मला दिला आहे. चौथ्या मजल्यावर हे मतदान होते. दोन सदस्य, मी व मंत्री आबा पाटील होते. 100 पोलीस त्याठिकाणी होते. 100 पोलिसांनी मला अडवले. तो सदस्य सांगत होता, माझ्यासोबत पालकमंत्री आहेत. त्यांना दरवाजापर्यंत येऊ द्या. दंडाला चार ते पाच पोलीस आरोपीला फरफटत नेतात, तसे मला व सदस्याला फरफटत नेले” असा दावा शंभूराजे देसाई यांनी केला.

    “यासंदर्भात मी चार दिवस गोळ्या खात आहे. मुका मार लागला आहे. माझे आजोबा राज्याचे गृहमंत्री होते. अध्यक्षांच्या आसनावर ते बसले होते. ही लोकशाही आहे का?” असा सवाल शंभूराजे देसाई यांनी केला.

    “समोरच्या बाजुला एका विशिष्ट पक्षाचे 10 ते 15 पदाधिकारी होते. जे आमदार, खासदार किंवा मंत्री नाहीत. मला लागले. मी डायबेटिस पेशंट आहे. रक्त वाहत होते. बॉडीगार्ड यांनी औषध दिले. आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक, देवकर व गर्जे यांना मी ओळखले आहे. विधानपरिषदेत त्यांना निलंबित केले आहे. या सभागृहात त्यांना बडतर्फ करावे” अशी मागणी शंभूराजे देसाई यांनी केली.

    #bjp Chief Minister Devendra Fadnavis Eknath shinde Minister Shubhamraj Desai Satara Zilla Parishad Shiv Sena Shinde Group Vidhya Sabha
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

    April 10, 2026

    जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!

    April 10, 2026

    नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.