Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    राजकारण

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    गिरीश महाजनांच्या घरी जाऊन विनंती : उपस्थित राहण्यास दिला होकार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 19, 2026No Comments659 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्राच्या आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे आणि भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी पाहायला मिळत आहे. एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी खडसेंच्या स्वीय सहाय्यकांनी थेट गिरीश महाजन यांचे घर गाठले. या सोहळ्याला उपस्थित राहण्यास मंत्री महाजन यांनी होकार दिला आहे.

    काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी मी दिल्लीला गेलो होतो. अमित शाह यांनी मला फोन करून बोलावले होते. अमित शाह यांनी मला सांगितले की, भाजप जॉईन करो, असा दावा केला होता. त्यानंतर आता महाजनांशी मैत्रीचा हात पुढे केल्याने खडसेंच्या भाजपमधील घरवापसीची ही तयारी तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि अमृत महोत्सवी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सुपूर्द केली.

    खडसेंच्या दोन्ही सहाय्यकांनी अत्यंत आदराने हात जोडून, मंत्री महाजन यांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती केली. त्यावर सुरुवातीला प्रतिक्रिया देताना महाजन मिश्किलपणे म्हणाले, सगळ्यांचा विषय वेगळा आणि माझा विषय वेगळा आहे. भेटीदरम्यान खडसेंच्या सहाय्यकांनी महाजनांना सांगितले की, या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे तुम्हीही यावे. मंत्री महाजन यांनी संपूर्ण निमंत्रण पत्रिका उघडून अत्यंत बारकाईने न्याहाळली. विशेष म्हणजे, त्यांनी हसतमुखाने मान डोलवत कार्यक्रमाला येण्याबाबत प्रतिसाद दिला.

    राजकीय वितुष्ट संपणार?

    गेल्या अनेक वर्षांपासून जळगावच्या स्थानिक राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात टोकाचे राजकीय युद्ध पाहायला मिळाले आहे. एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी या दोन्ही नेत्यांनी सोडलेली नाही. अशा परिस्थितीत एकनाथ खडसेंनी पुढाकार घेत आपल्या खास दूतांना महाजनांच्या घरी पाठवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif