बाळासाहेबांसारखी भगवी शाल घातली तर त्यांनी बाळासाहेब होण्याचे स्वप्न पाहु नये

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

काही लोकांनी श्रीराम, श्री हनुमान या सारख्या देव देवतांचा आपल्या राजकीय स्वार्थापोटी पक्षात प्रवेश करुन घेतला असुन भाजपा वाल्यांनी तर शिवसेना हा पक्ष मुळ विचारापासुन लांब गेल्याची बतावणी करत शिवसेनेला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे. माझ्या जिल्ह्यात माझ्या पक्षाचे पाच आमदार असल्याने राज्यात मनसेचा केवळ एकच आमदार आहे. त्यामुळे मी त्यांच्या पेक्षा नक्कीच श्रेष्ठ असुन राज ठाकरे यांनी बाळा साहेबांसारखी भगवी शाल घातली तर त्यांनी बाळासाहेब होण्याचे स्वप्न पाहु नये. त्यांचे भोंगे कधी पासुनच बंद झाले असून खा. नवनीत राणा यांचेवर टिका करतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सद्या प्रत्येक टी. व्ही. चॅनलवर व वृत्तपत्रांवर एकच चेहरा दिसत असुन नागरिकांनीही तो चेहरा किती वेळा पाहावा. व मिडियानेही एखाद्याचे किती कौतुक करावे याबाबत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात शिवसंपर्क अभियानाचा समारोप मेळाव्या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या अध्यक्षीय भाषणा प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते तथा जिल्ह्याचे निरीक्षक लक्ष्मणराव वडले, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगर प्रमुख शरद तायडे, उपसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, डॉ. हर्षल माने, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, उप महापौर कुलभूषण पाटील, सुनिल पाटील, डॉ. विशाल पाटील, संजय पाटील, विराज तावडे, मा. नगराध्यक्ष संजय गोहिल, रमेश बाफना, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, पदमसिंग पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, प्रविण ब्राम्हणे, जावेद शेख, मतिन बागवान, आयुष बागवान, प्रविण ब्राम्हणे, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, शिवदास पाटील, रवि गीते उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शिवसैनिकांनी राज्यात झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेऊन शिवसेनेची बदनामी करणाऱ्यांना जागेवरच उत्तर देण्याची धमक ठेवावी. केंद्र सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव गगनाला भिडले असुन दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे. वाढत्या महागाईपासुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे काही लोक शिवसेनेची बदनामी करत आहेत.

यावेळी खा. उन्मेष पाटील यांच्यावर टिका करतांना ना. पाटील म्हणाले की,  गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या ९ दिवसांत मोठ्या फरकाने निवडुन आणले. मात्र ते माझ्या निवडणुकीचा साधा उमेदवारी अर्ज ही दाखल करण्यासाठी आले नाही. ते जर आम्हाला होत नाही तर सर्व सामान्य जनतेला काय होतील. असे उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी आश्वासित केले. भविष्यातील नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असुन येत्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची सत्ता ही एक हाती शिवसेनेकडे असेल. मेळाव्याच्या समारोप प्रसंगी आ. किशोर पाटील, गुलाबराव वाघ, लक्ष्मणराव वडले, संजय सांवत, विष्णु भंगाळे यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी नगरदेवळा, गाळण व शिंदाड येथील अनेक युवक व महिलांनी विविध पक्षातुन शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्याचे सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले.

शिवसंपर्क अभियानानिमित्त आ. किशोर पाटील, लक्ष्मणराव वडले, संजय सांवत, सुमित किशोर पाटील, किशोर बारावकर यांचेसह युवा सेनेच्या पदाधिकारी व युवकांनी मोटरसायकल वरुन भगवे झेंडे लावुन महालपुरे मंगल कार्यालयापासुन जारगाव चौफुली, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजे संभाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.