Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»गुलाबरावांसाठी धोक्याची ‘घंटा’!
    जळगाव जिल्हा

    गुलाबरावांसाठी धोक्याची ‘घंटा’!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 22, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीतून राजकारणात महत्त्वाचा संदेश देणारा निकाल समोर आलो. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वतःच्या तालुक्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार मुसंडी मारत सत्तास्थानावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महायुतीच्या उमेदवार विणा भावे यांचा पराभव हा केवळ एका नगरपालिकेचा निकाल नसून, तो सत्ताधारी गटातील अंतर्गत विसंवाद, स्थानिक असंतोष आणि बदलाची जनभावना यांचे प्रतिबिंब मानले जात आहे.

    धरणगाव ही पालकमंत्र्यांची राजकीय कर्मभूमी होय, त्यामुळे येथील निवडणूक गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई ठरली होती. त्यांच्या पुढाकारातून येथे महायुती म्हणून निवडणूक लढवण्यात आली. भाजप, शिंदे गट आणि इतर घटक एकत्र येऊन ताकद दाखवतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने ही अपेक्षा फोल ठरवली. महायुतीने एकसंघपणे काम केले नसल्याचे या पराभवातून स्पष्टपणे समोर आले आहे. या निकालामागे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्थानिक नागरी प्रश्न होते. धरणगाव शहरात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था यासारखे मूलभूत प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्याकडे राज्यस्तरीय ताकद असतानाही शहरातील प्रश्न सुटले नाहीत, ही भावना नागरिकांमध्ये खोलवर रुजली होती. ‘सत्ता असूनही विकास का नाही?’ हा प्रश्न मतदारांच्या मनात घर करून होता. त्यातूनच परिवर्तनाची गरज अधिक तीव्र झाली.

    शिवसेना (उबाठा) गटाने नेमकी हीच असंतोषाची नस पकडली. त्यांनी प्रचारात स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. केवळ भावनिक किंवा पक्षनिष्ठेवर आधारित राजकारण न करता, ‘शहरासाठी काय केले आणि काय राहिले’ याचा हिशेब मतदारांसमोर मांडला. परिणामी मतदारांनी सत्ताधाऱ्यांना धक्का देत विरोधकांना संधी दिली. महायुतीच्या पराभवामागे अंतर्गत नाराजीही मोठे कारण मानले जात आहे. उमेदवारी वाटप, प्रचारातील समन्वयाचा अभाव आणि स्थानिक कार्यकर्त्यांमधील असमाधान हे घटक निवडणुकीदरम्यान स्पष्टपणे दिसून आले. एकत्र लढत असल्याचे चित्र वरवर होते; मात्र तळागाळात एकजूट नव्हती. याचा थेट फटका उमेदवाराला बसला. हा निकाल गुलाबराव पाटील यांच्यासाठी राजकीय इशाराच म्हणावा लागेल. जिल्ह्यातील बलाढ्य नेते म्हणून त्यांची ओळख असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर मतदार आता अधिक सजग झाले आहेत. केवळ मंत्रीपद किंवा सत्ता यावर विश्वास न ठेवता, प्रत्यक्ष कामगिरीवर मतदान करण्याची मानसिकता वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात केवळ राजकीय समीकरणे जुळवून निवडणुका जिंकता येणार नाहीत, तर स्थानिक विकासाला प्राधान्य द्यावे लागेल, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.

    दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) गटासाठी हा निकाल आत्मविश्वास वाढवणारा आहे. राज्यात सत्तेबाहेर असतानाही स्थानिक पातळीवर प्रभावी संघटन, मुद्देसूद प्रचार आणि योग्य उमेदवार दिल्यास यश मिळू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. एकूणच, धरणगाव नगरपालिकेचा निकाल हा केवळ स्थानिक सत्ता बदलापुरता मर्यादित नाही. तो सत्ताधारी महायुतीसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आणणारा, तर विरोधकांसाठी संधीची दारे उघडणारा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Dharangaon Minister Gulabrao Patil nagarpalika election
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif