Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे विधान
    ताज्या बातम्या

    सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे विधान

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 31, 2026Updated:January 31, 2026No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या शेजारी अपघात झाला. अजित पवार यांच्यासह 5 जणांचे या अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या विमान अपघाताची सध्या चाैकशी केली जात आहे. अजित पवार यांचे निधन झाले यावर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. अजित पवार यांच्या निधनानंतर काल काही विधी सुरू होते, त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार या थेट मुंबईत दाखल झाल्या. आज पक्षाची 5 वाजता बैठक असून सुनेत्रा पवार या 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, हा प्रश्न राष्ट्रवादीचा आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल असे मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना सांगितलं आहे. आम्हाला काही अडचण नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला खूप घाई होत असलेल्या प्रश्नावर उत्तर देत महाजनांनी म्हटले की, काही तांत्रिक अडचण किंवा रणनीती असेल, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतलाय.घाई होते आहे की नाही याबाबत मी काय बोलावे. त्यांची काही तरी अडचण असेल, काही तरी कारण असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर गिरीश महाजन यांनी म्हटले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमचा विषय नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच, आम्हाला कुठली अडचण नाही. सुनेत्रा वाहिनी आणि त्यांनी ठरवावे. त्यांनी ठरवावे काय करायचे एकत्र होण्याबाबत काही असत तर त्यांनी बोलावलं असत. धावपळीत छोटे खाणी कार्यक्रम आहे, सर्वांनाच बोलावले नाही, मी जाणार आहे, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले. अजित पवार यांच्या निधनाच्या काही तासात सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif