Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»भाजप स्वबळावर निवडणूक लढणार?
    महाराष्ट्र

    भाजप स्वबळावर निवडणूक लढणार?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    राज्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा संकेत आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. तर काही पक्षांकडून स्वबळाची देखील चाचपणी होत आहे. त्यातच आता भाजप देखील स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू असून यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा केला आहे.

     

    गिरीश महाजन काय म्हणाले ? 

    स्वबळाचा नारा मी अजून दिलेला नाही, मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये भाजप 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकू शकते. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल, मित्र पक्षही आमच्यासोबत असतील. जळगाव ,धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा येण्याची शक्यता आहे. या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद कायदा हा लागू झालाच पाहिजे. आठ राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे, लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

    तसेच  शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे देखील नारज असल्याची माहिती समोर येत आहे. यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तिकडे एकाच माणसाला संधी आहे, ते म्हणजे संजय राऊत, क्षमतेपेक्षा जास्त ते त्या ठिकाणी बोलत आहेत. क्षमता नसताना सुद्धा बडबड करत आहेत. बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

     

    Minister Girish Mahajan Sthanik Swarajya Sanstha Election
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif