मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते मोफत गृहपयोगी साहित्य संच वाटप

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते २०७० बांधकाम कामगार बंधू भगिनींना मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे वाटप नुकतेच करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन पूजन गिरीश महाजन, संजय गरूड, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, संजय पाटील, पालक पदाधिकारी सुहास पाटील, उपसरपंच दिपक खरे, विकासो चेअरमन प्रभाकर चौधरी व परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र बांधकाम कामगार अतंर्गत मोफत घरगुती भांडे, पेट्यांच्या नोंदणीसाठी भडगाव चाळीसगाव जावं लागत होते ती सुविधा लोहारा कुऱ्हाड सर्कलमध्ये भाजपा कार्यकर्ते कैलास चौधरी व जगदीश तेली यांनी राबविण्यासाठी महाजनयांच्या कडे मागणी केली. व त्यानुसार महाजन यांनी बांधकाम कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना लोहारा कुऱ्हाड सर्कल मधील गावात जाऊन नोंदनी कॅम्प घेत लाभार्थ्यांची होणाऱ्या त्रासापासून सुटका केली.

थेट गावातच घरगुती भांडे वाटप गिरीश महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सर्व लाभार्थी महिला, पुरुष मंडळीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

यावेळी महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन हे सर्वसामान्य कामगार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन चालणारे सरकार आहे. यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना, लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना, अन्नपूर्णा योजना, मोफत गॅस योजना यांसह राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्व घटकातील प्रत्यक्ष लाभ देणारे व योजना जाहीर करून त्या राबवून दिलेला शब्द पाळत योजना प्रभावीपणे राबविणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.

महिलांना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी करण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले. विरोधकांजवळ मुद्दे नसल्यामुळे ते हलबल झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे येत्या काळात आपण आपला आशीर्वाद आम्हाला द्यावा असे आवाहन केले.

महाराष्ट्र शासनाने तेली समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळ स्थापन केल्याबद्दल तेली समाजातर्फे गिरीश महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तेली माळी, पाटील, कोळी, राजपूत समाजासाठी सामजिक सभागृहाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाजन यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांनी केले तर सूत्रसंचलन दिपक पवार यांनी केले.तर आभार उपसरपंच दिपक खरे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, पुरुष, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.