आर्थिक झळ : जिल्हा दूध उत्पादक संघाने केली दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ
जळगाव ;– जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने प्रति लिटर २ रुपयांनी दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे गृहिणींपासून ते चहा विक्रेते यांना आर्थिकझळ सोसावी लागणार असून शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा मिळणार आहे.
ही नवीन दरवाढ चार दिवसांपासून लागू झाली असून, आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हा आणखी एक आर्थिक फटका आहे. अनेक हॉटेल आणि चहावाले त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता वर्तवत आहेत. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल.
दरवाढीची कारणे
गाई व म्हशींसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या किंमती वाढल्या आहेत.
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे.
शेतीसाठी लागणाऱ्या खत व औषधांच्या किमती वाढल्याने दूध उत्पादन खर्च वाढला आहे.
नवीन दूध दर (प्रति लिटर)
दूध प्रकार | पूर्वीचा दर | नवा दर |
---|---|---|
गोल्ड दूध | ७० रु. | ७२ रु. |
म्हशीचे दूध | ६२ रु. | ६४ रु. |
गायीचे दूध | ५२ रु. | ५४ रु. |
ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी नवा आर्थिक भार ठरू शकते, तर शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी ठरेल.