Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हाफ मर्डर प्रकरणात फरार असलेल्या तिघांना अटक
    गुन्हे वार्ता

    हाफ मर्डर प्रकरणात फरार असलेल्या तिघांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 19, 2025Updated:March 19, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हाफ मर्डर प्रकरणात फरार असलेल्या तिघांना अटक

    हाफ मर्डर प्रकरणात फरार असलेल्या तिघांना अटक

    चोरीच्या चार मोटारसायकली जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

    जळगाव:प्रतिनिधी ;– एमआयडीसी पोलिसांनी हाफ मर्डर प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला होता.

    दि. १६ मार्च २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने गस्त घालतान संशयित मुबीन शाह शकील शाह (वय २०, रा. मालेगाव), दानिश शाह जहीर शाह (वय २०, रा. मालेगाव) आणिअमीर उर्फ अमिन शाह जहुन शाह (वय २२, रा. जळगाव) यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहून ते पळू लागले, मात्र पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडील मोटारसायकलींबाबत विचारपूस केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तांत्रिक तपासानंतर या मोटारसायकली मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

    आरोपींकडून पोलिसांनी बजाज विक्रांत – MH-19 CK 7697 ,हिरो स्प्लेंडर विना नंबर ,सुझुकी बर्गमन विना नंबर , हिरो एचएफ डिलक्स विना नंबर अशा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

    संशयित आरोपी हाफ मर्डर प्रकरणात फरार होते. आझाद नगर पोलीस ठाणे, मालेगाव येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४४/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम १०९, आर्म अॅक्ट ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून अधिक तपास सुरू केला असून, इतर मोटारसायकल चोरीचे गुन्हे शोधण्याचे काम सुरू आहे

    ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते यांनी केली .

     

    #crime MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif