लोहारा लोकशाही न्यूज नेटवर्क
म्हसास येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंचसहित नऊ लोकप्रतिनिधींची बॉडी कारभारी होती यात उपसरपंच यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने अपात्र व्हावे लागले यामुळे समान बलाबल शिल्लक राहून तर्क-वितर्काच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवडणूक उमेदवारी करताना जाती-जमातीधारकांना जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्याच्या दिवसापासून एक वर्षाच्या आत सादर करणार असे बंधनकारक जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञापत्र लिहून दिले जाते याचप्रमाणे येथील उपसरपंच श्रीमती नबाबाई अर्जुन भिल्ल वार्ड क्रमांक-3 मधून उमेदवारी करून विजयी होऊन उपसरपंचपदी विराजमान झालेल्या होत्या
त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे अशी तक्रार येथील श्रीमती रत्नाबाई संतोष कोळी यांनी जिल्हाधिकारी यांकडे केलेली होती. या अनुषंगाने उपसरपंच हे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाही असे सिद्ध झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 -1-(अ) नुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले. अर्जदार यांचेकडून ॲड. विश्वासराव भोसले जळगाव यांनी काम पाहिले.