दिल्ली मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जनरल मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DMRC) तर्फे जनरल मॅनेजर (सिव्हिल) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १४ नोव्हेंबर २०२५ ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्जदारांनी delhimetrorail.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाचा फॉर्म डाउनलोड करावा. तो पूर्णपणे भरून खालील पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे –
जनरल मॅनेजर (एचआर), प्रोजेक्ट दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बारखंभा रोड, नवी दिल्ली.
याशिवाय अर्जदारांनी कागदपत्रांची स्कॅन कॉपी career@dmrc.org