मेरा युवा भारत – प्रमोशन ऑफ़ फिट इंडिया फिटनेस क्लब्सद्वारे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव;- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार मेरा युवा भारत – नेहरू युवा केंद्र जळगाव, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारने फिट इंडिया फिटनेस क्लबना प्रोत्साहन देण्यासाठी जानेवारी महिन्यात ०५ ब्लॉक स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते.
या ब्लॉक स्तरावरील स्पर्धांमधील विजेते १६ मार्च २०२५ रोजी एकलव्य अकादमीमध्ये आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, १०० मीटर शर्यत आणि गोळाफेक या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
जिल्हास्तरीय स्पर्धेत खासदार श्रीमती स्मिता वाघ उपस्थित होत्या आणि त्यांनी सहभागी तरुणांना प्रोत्साहन दिले. तसेच त्यांनी तरुणांना निरोगी राहण्यासाठी नियमितपणे खेळांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले. खासदार स्मिता वाघ यांनी भारत सरकारच्या वतीने ब्लॉक स्तरावरील विजेत्या संघांना क्रीडा साहित्याचे किट प्रदान केले तसेच त्यांनी आपापल्या गावांमध्ये मैदाने तयार करून तरुणांना खेळांकडे आकर्षित करण्यासाठी प्रेरित केले.
जिल्हास्तरीय स्पर्धांमधील विजेत्यांना खासदार स्मिता वाघ, जितेंद्र खर्चे, कृष्णचंद बेरोलकर, नरेंद्र यांनी विजेत्यांना पदक आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात, जिल्हा युवा नेते नरेंद्र यांनी स्पर्धांचे उद्दिष्ट आणि रूपरेषा सादर केली आणि अजिंक्य गवळी यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल तुषार साळवे,
मुकेश भालेराव, रोहन अवचरे, अनिल बाविष्कर , मनोज पाटील, योगेश चौधरी, साहिल साळवे, सिद्धार्थ
सोनवणे आणि भावेश अडकमोल यांनी परिश्रम घेतले.
विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे-
खो-खो –
प्रथम – हिरा इंटरनॅशनल स्कूल, धरणगाव
द्वितीय- जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, यावल
तृतीय – संत मुक्ताई कॉलेज, मुक्ताईनगर
१०० मीटर शर्यत (महिला)-
प्रथम – प्रतीक्षा महाजन, पाचोरा
द्वितीय- शोभा धनगर, मुक्ताईनगर
तृतीय – श्रुती सराफ, यावल
गोळाफेक (महिला)-
प्रथम – सविता परदेशी, यावल
द्वितीय- सोनी भिल, पाचोरा
तृतीया – फाल्गुनी पवार, धरणगाव
कबड्डी –
प्रथम – संत मुक्ताई संघ, मुक्ताईनगर
द्वितीय – योद्धा संघ, चोपडा
तृतीय – जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, यावल
१०० मीटर शर्यत (पुरुष गट)-
प्रथम – हिमांशू भालाशंकर, मुक्ताईनगर
द्वितीय – करण चिखलकर, मुक्ताईनगर
तृतीय – कृष्णा धोबी, मुक्ताईनगर
गोळाफेक (पुरुष गट)-
प्रथम – गोपाळ सपकाळे, मुक्ताईनगर
द्वितीय – तोशिब पटेल, पाचोरा
तृतीय – दीपक माळी, पाचोरा