Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बीड पुन्हा हादरले : गतिमंद मुलीवर बलात्कार
    गुन्हे वार्ता

    बीड पुन्हा हादरले : गतिमंद मुलीवर बलात्कार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. 2 जून रोजी केज पोलीस स्टेशनमध्ये एका गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार करणारा आरोपी नानासोबब चौरे हा वाल्मिक कराडचा चेला असल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण बीड हादरुन गेले आहे.

    काल केज पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातील गतिमंद मुलीवर नानासाहेब चौरे या नराधमाने बलात्कार केला. बळजबरी बलात्कार करताना पिडीतेच्या नात्यातील एका महिलेने पाहिले. त्या महिलेने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी नानासाहेबाने महिलेला धमकी दिली. ‘हा प्रकार कोणाला सांगू नको नाहीतर तुझं काही खरं नाही’ अशी धमकी देऊन तो पळून गेला. यानंतर पिडीतेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

    नानासाहेब चौरे या आरोपीला रात्री पोलिसांनी अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी नानासाहेब चौरे यांनी वाल्मिक कराड याच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. आता वाल्मिक कराडच्या या चेल्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    बुधवारी एका गतिमंद तरुणीवर वाल्मिक कराडच्या चेल्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही तरुणी एका रुग्णालयासमोर उभी होती. ती एकटी उभी असल्याचे पाहून या आरोपीने तिला आडोशाला नेले. नंतर तिच्यावर अत्याचार केले. ही घटना तरुणीसोबत असलेल्या एका महिलेने पाहिली. तेव्हा आरोपीने त्या महिलेला कोणालाही याबद्दल न सांगण्याची धमकी दिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. केज पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

    #rape Beed Beed Crime case registered Kage Police Station Speedy Girl Valmik Karad
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif