मेमू एक्सप्रेस आता तिरंगा एक्सप्रेस; आज पासून धावणार…

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत शनीवार 13 ऑगस्ट रोजी भुसावळ रेल्वे विभागातून धावणारी “भुसावळ-इगतपूरी मेमू एक्सप्रेस” आता “तिरंगा एक्सप्रेस” म्हणून चालविण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

भुसावळ, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव रेल्वे स्थानकावर स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन “तिरंगा एक्सप्रेस” चे स्वागत करणार आहेत. तरी या एक्सप्रेसच्या स्वागतासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.राऊत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here