Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»शिवार रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
    महाराष्ट्र

    शिवार रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

    भद्रावतीतील वाहतूक कोंडीवर उपाय : नगर परिषद अध्यक्ष प्रफुल चटकी यांचा पुढाकार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2026No Comments49 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भद्रावती, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषद भद्रावतीचे अध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार भद्रावती यांना निवेदन सादर करण्यात आले. मोझा-भद्रावती, चिचोर्डी व केमुर्ली शिवारातील रामटेके रॉयल डेपो ते कोल्हटकर यांचे शेत, तेथून बालाजी वॉटर पार्क मार्गे केमुर्ली रस्त्यापर्यंतचा ८० फूट रुंदीचा शिवार रस्ता मोकळा करून वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर शिवार रस्ता सध्या वापरात नसल्याने केमुर्ली व चिचोर्डीकडे जाणारी जड वाहने भद्रावती शहरातूनच मार्गक्रमण करतात. त्यामुळे मुख्य बाजारपेठ, मेडिकल चौक, मेन मार्केट, बसस्थानक परिसर आणि इतर प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हा शिवार रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यास शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

    तसेच चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील मानोरा फाटा परिसरातून येणाऱ्या जड वाहनांसाठी हा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास शहरातील मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी नगर परिषद अध्यक्ष प्रफुल चटकी, विविध नगरसेवक, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif