लोकशाही संपादकीय लेख

काल गिरीश महाजन यांचे बाबतीत मुलींचे जे फोटो व्हायरल झाले, ते प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुलींचे फोटो मॉर्फ करून त्यांचा संबंध गिरीश महाजन यांच्याशी जोडण्याप्रकरणी गिरीश महाजन यांनी मुंबईला पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फोटो मॉर्फ करून त्यातील इतर लोकांचे फोटो उडवून फक्त महाजन यांचेच फोटो त्यात एआयच्या माध्यमातून दिल्या प्रकरणी एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर हे फोटो एकाने दुसऱ्याला आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याला व्हायरल करण्याचा प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गिरीश महाजन यांच्या चारित्र्य हननाचा प्रकार झाल्याने गिरीश महाजन हे स्वतः तक्रार दाखल करणार आहेत. इतर ठिकाणी व्हायरल झालेले हे तरुणीचे फोटो उडवण्यात आले आहेत. फक्त सोशल मीडियावर ते आता शिल्लक आहेत. सोशल मीडिया वरून ज्यांनी ते फोटो व्हायरल केले त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. कुणाला कुणाची प्रगती सहन होत नाही म्हणून असे घाणेरडे कृत्य करण्यात येते, असे स्पष्टपणे दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणून गिरीश महाजन यांचे जळगाव जिल्ह्यातील समर्थक पोलीस स्टेशनवर मोर्चे काढून संबंधित फोटो व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन त्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी असे निवेदन ठिकठिकाणी जिल्ह्याभरातून देण्यात येत आहे. वरणगाव येथील नागरिकांनी वरणगाव पोलीस स्टेशनला जाऊन अशा आशयाचे निवेदन दिले आहे की, गिरीश महाजन यांच्या विरोधात ज्यांनी कोणी हे षडयंत्र रचले आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना पकडून अटक करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे म्हटले आहे. वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे यांचे नेतृत्वात आज वरणगावकरांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन त्यांना निवेदन दिले. या प्रकरणी बोलताना सुनील काळे हे म्हणाले की, खऱ्या अर्थाने संकट मोचक असलेल्या गिरीश महाजन यांची बदनामी करण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. फोटो मॉर्फ करून त्यांचा संबंध गिरीश महाजनांशी जोडणे हे घाणेरडे कृत्य विरोधकांनी केले आहे. अशाने बदनामी होते बाकी काही नाही. त्यासाठी पोलिसांनी त्याचा सूत्रधार शोधून काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक शिक्षा करावी. वरणगावकरांच्या वतीने आणखी इतर नागरिकही आपले मत व्यक्त करत आहेत आणि दोषींना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. यावल येथे आमदार अमोल जावळे यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशनवर मोर्चा नेण्यात आला आणि अशा प्रकारे घाणेरडी कृत्य करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी गिरीश महाजन हे खऱ्या अर्थाने पार्टीसाठी संकट मोचक आहेत. त्यांच्यावर असे कृत्य करून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रकार केल्याबद्दल संबंधितांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सावदा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चा आणि जाऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, गिरीश महाजनांचे चारित्र्य हनन करणाऱ्याचा शोध घेऊन त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी..
विविध प्रकारचे अश्लील फोटो मुली सोबतचे काढून ते व्हायरल करण्याचा प्रकार आपल्याकडे नेहमीच होत असल्याचे दिसून येते. त्या फोटोमध्ये काही तथ्य असेल तर ते आपण समजू शकतो काही फोटो हे खरोखरच तशा प्रकारचे असतात की, जेणेकरून मुलींचीही त्यात संमती असते त्यानुसार नागडे फोटो काढून ते त्या माणसासोबत ते व्हायरल होतात. त्या फोटोला कोणी नकार देणार नाही, पण फोटोमध्ये छेडछाड करून ते फोटो अश्लील पणे त्या माणसासोबत दाखवणे अत्यंत चुकीचे आहे. अलीकडे एआयच्या माध्यमातून कोणतेही फोटो कसल्याही पद्धतीने काढून त्यांचा संबंध जोडला जातो. फोटो पाहताच लक्षात येतो की त्या फोटोमध्ये छेडछाड झालेली आहे. गिरीश महाजन यांच्या बाबतीत जो फोटो काढला तो अशाच प्रकारातला आहे. त्यामुळे हे केवळ बदनामी करण्यासाठी त्या माणसाचे चारित्र्य हनन करण्यासाठीच करण्यात आलेले फोटो आहेत. याबाबतीत खुद्द गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, मी रीतसर पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. सायबरमध्ये तक्रार करून त्यांची दाद मागणार आहे. त्यामुळे “दूध का दूध, पानी का पानी” होईलच, त्याबद्दल मला शंका नाही. याबाबतीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रीतसर खुलासा केला आहे. त्यामुळे आता ही लढाई न्यायाची लढाई असून पोलीस त्याचा शोध घेतील असे महाजन म्हणाले. एकंदरीत अशा प्रकाराचा प्रयोग करून कोणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवणे योग्य नाही, असे महाजन म्हणाले..!


