धक्कादायक; मेमो ट्रेनच्या धडकेत गुराख्यासह १० जनावरांचा मृत्यू

0

 

चाळीगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चाळीसगाव-धुळे डाऊन मेमो ट्रेनच्या धडकेत गुराख्यासह जवळपास १० जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चाळीसगाव-जामदा रेल्वे स्थानका दरम्यान तालुक्यतील शिंदवाडी शिवारात हि घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.

मयताचा नावे रोजंद्र सुर्यवंशी असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी मेहुणबारे पोलिसांनी धाव घेतली असून ते पंचनामा करीत आहे. गुराखी राजेंद्र सुर्यवंशी गुरे चारल्यानतंर घरी जाण्यासाठी रेल्वे रुळ पार करताना ही दुदैवी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. गुराख्यासह जनवारांचा मृत्यू झाल्याने शिंदवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळाचे जनावरांच्या मृतदेहांचे सर्वत्र तुकड्याच्या खच पडलेला असल्याचे विचित्र दृश्य होते. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार एक इसम व दहा जनावरे असल्याचा अंदाज व्यक्त केला. मयत जनावरांमध्ये गायी, म्हशी व वासराचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.