Saturday, January 28, 2023

आर आर आबांचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण…

- Advertisement -

 

कोल्हापूर, लोकशाही न्युज नेटवर्क;

आर आर आबा यांच्यानंतर रोहित पाटील राजकारणात जास्त सक्रिय झाले. त्यांनी नगरपरिषद निवडणुका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत मोठं काम केलं. त्यांच्या पॅनलला विजय मिळवून दिला आणि भाजपलाही शह दिला होता. कट्टर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून आर आर आबा पाटील यांची ओळख होती. आता त्यांच्या मुलाने मुख्यमंत्र्यांची विमानतळावर भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करतानाचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करत आहेत. आज कोल्हापुरात पूर स्थितीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौरा केला. यावेळी त्यांचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्रातील गृहखात्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे व निर्णायक धाडसी निर्णय घेणारे सर्वसामान्यांचे लोकनेते स्व. आर आर आबांच्या पुतळ्याचे दर्शन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यावेळी घेतलं.

राज्यात सध्या सत्तासंघर्षावरून जोरदार राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे युवा नेते आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहित पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं आहे. यावेळी स्वागत करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे