Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
    राजकारण

    शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 18, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांनी त्यांची ही भेट राजकीय नसल्याच सांगितलं आहे. शेतीच्या विषयाशी संबंधित ही भेट होती. पण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात महायुतीच सरकार सत्तेवर आल्यानंतर नवीन समीकरण जुळतील असं चित्र दिसू लागलय.

    12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस झाला. त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांच्यापासून दुरावलेले त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं अशी चर्चा सुरु झाली आहे. म्हणून शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट महत्त्वपूर्ण ठरते.

    शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटले, त्यवेळी सातारा आणि फलटणचे दोन डाळिंब उत्पादक शेतकरी त्यांच्यासोबत होते. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शेतकऱ्यांच्या डाळिंब पिकाशी संबंधित ही भेट होती, असं पवारांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पवारांनी त्यांना भेट म्हणून डाळिंब दिली. या भेटीतून कुठलाही राजकीय अर्थ निघू नये, म्हणून ही भेट फक्त पाच मिनिटांचीच होती, असं शरद पवार म्हणाले.

    मागच्यावर्षी पुण्यात पीएम मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली होती. त्या कार्यक्रमात शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर आले होते. त्या कार्यक्रमात पीएम मोदींना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावरुन राजकारणही बरच झालं.

    #maharashtra #ncp #politics Delhi Grand Alliance Government Parliament House Prime Minister Narendra Modi sharad pawar Sharad Pawar Narendra Modi Visit
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट

    July 20, 2026

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनस्थळी गोंधळ

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif