मोठी घोषणा.. आता महाराष्ट्रातही वैद्यकीय शिक्षण मिळणार मराठीतून

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वैद्यकीय शिक्षण (Medical education) हिंदी भाषेतून *Hindi language) सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश (Madhya Pradesh) घेतला. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून उपलब्ध करून देणं, ही मध्यप्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या हस्ते हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश हे हिंदीतून वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवणारं देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे.

मध्य प्रदेशच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही (Maharashtra Govt) वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून (Marathi) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी भाषेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Medical Education Minister Girish Mahajan) यांनी दिली.

एमबीबीएस (MBBAS) किंवा मेडिकल यासारख्या शाखांचं शिक्षण इंग्रजी भाषेतूनच दिलं जाणार आहे, मात्र, विद्यार्थांना विषय समजून घेता यावा, यासाठी संबंधित विषयांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद केला जाणार आहे.

सदर योजनेची माहिती देताना गिरीश महाजन म्हणाले, एमबीबीएस, मेडिकलनंतर नर्सिंग, डेंटल अशा अभ्यासक्रमाचं टप्प्याटप्प्याने अनुवाद करण्यात येणार आहे. यावर्षी एमबीबीएसचा अभ्यासक्रम मराठीतून अनुवाद केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही अभ्यासक्रम मराठीत अनुवाद केले जातील. पुढील वर्षापासून विद्यार्थांना संबंधित पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण हे इंग्रजीतच असणार आहे. पण ते विद्यार्थांना समजण्यासाठी सोपं जावं म्हणून त्याचा मराठीत अनुवाद केला जाणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.