लोकशाही विशेष लेख
रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी पुढील उपायाचे अवलंब करणे आवश्यक आहे.
◾परिसरात झाडं लावून टवटवीत वातावरण ठेवा. झाडांमधून ऑक्सिजन तर मिळतो, शिवाय वातावरणात ‘फ्रेशनेस’ सुद्धा येतो. घरात इनडोअर प्लांट्स, जसं की मनी प्लांट, जरबेरा, लिली लावून वातावरण फ्रेश ठेऊ शकतो.
◾सतत भीती, स्ट्रेस असला तर त्याचा श्वसनावर परिणाम होतो. भीतीमुळे श्वास लागून राहतो, विनाकारण धाप लागते. त्यामुळे शक्य तितकं मन शांत ठेवायचा प्रयत्न करा. त्यासाठी दररोज सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम, मेडिटेशन हे उपाय करणे गरजेचे आहे.
◾दिवसभर आवश्यक तेव्हढं पाणी प्यायला हवं. पाणी प्यायल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. त्यामुळे सतत पाणी पीत राहणं हिताचं आहे. बऱ्याच जणांना सारखं पाणी जात नाही, अशांसाठी ताज्या फळांचा रस हा एक उत्तम पर्याय आहे.
◾काही अन्नपदार्थांचा रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवायला उपयोग होतो. आहारात ताज्या भाज्या, जसं की पालक, बीन्स, ढोबळी मिरची, बटाटा, गाजर यांचा समावेश करावा. याच बरोबर जेवणातलं मिठाचं प्रमाण कमी केल्याने फरक पडतो.
◾आहारात मिठाचं प्रमाण जास्त असेल तर ब्लोटिंग, म्हणजेच शरीरात जास्तीच पाणी भरून राहिल्या सारखं होतं. त्यामुळे ते प्रमाणा बाहेर न खाल्लेलंच बरं, त्यासाठी पापड, लोणची असे पदार्थ कमी करायला हवेत, ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं.
◾आहारात ऍसिडचं प्रमाण जास्त असेल, तर त्याचा श्वासावर परिणाम होतो. त्यामुळे श्वासाचे आजार होऊ शकतात. ज्यांना श्वासाचा त्रास आहे, ज्यांना रक्तातलं ऑक्सिजन वाढवायचं आहे, त्यांनी आहारात पुढील भाज्यांचं, अन्नघटकांचं प्रमाण वाढवलं तर नक्की फरक जाणवेल.
◾हळद, पुदिना हे फुफुसांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात, त्यामुळे फुफुसांची कार्यक्षमता वाढते आणि रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढायला मदत होते.
◾केळी, खजूर, काळ्या मनुका, गाजर, लसूण. या सगळ्या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडण्ट्सचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असतात. याशिवाय लसूण आणि खजूर रक्तदाब सुद्धा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.
◾जर्दाळू पित्त कमी करायला मदत करतो, त्यामुळे रक्तात ऑक्सिजनची कमतरता असेल आणि आहारात जर्दाळूचा समावेश केला तर हमखास फायदा होऊन ऑक्सिजनची पातळी वाढायला मदत होईल.
◾द्राक्ष, बेदाणे, अननस, पीयर या सगळ्या फळांचा pH जास्त असतो, म्हणजेच ते ऍसिडिक नसतात. या फळांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स सुद्धा जास्त प्रमाणात असतात. हे पदार्थ उच्च रक्तदाब असलेल्या असलेल्यांसाठी लाभदायक आहेत. रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या पदार्थांचा उपयोग होतोच.
◾किवी या फळात साखर असते, तिचं विघटन होताना शरीरात ऍसिड तयार होत नाही आणि याच कारणामुळे रक्तात ऑक्सिजन वाढवण्यासाठी हे उपयुक्त आहे. याशिवाय यामध्ये फ्लावनॉइड्स नावाचं एक कम्पाऊंड असतं, जे लाभदायक असतं.
◾शतावरीमुळे शरीरातील ऍसिडचं प्रमाण कमी होतं. शतावरीच्या या गुणामुळे ती आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
◾आंबा, कलिंगड, टरबूज, पपई या फळांचा pH जास्त असल्याने त्यामध्ये ऍसिड कमी असते, जे रक्तातला ऑक्सिजन वाढवण्यासाठी मदत करते. पपईमुळे पोट साफ होतं. कलिंगडात पाण्याचं प्रमाण खूप असतं, ज्यामुळे मूत्राशयाचे विकार दूर होतात. आंब्यात आणि कलिंगड, टरबुजात खूप प्रमाणात व्हिटॅमिन्स आढळतात.
◾ढोबळी (सिमला) मिरची मध्ये अशी काही द्रव्य असतात ज्याचा चांगला परिणाम शरीरातल्या हार्मोन्सवर होत असतो. ढोबळी मिरची मध्ये व्हिटॅमिन ‘ए’ चं प्रमाण चांगलं असतं, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
◾लिंबात व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण जास्त असतं. लिंबू हे शरीराबाहेर जरी ऍसिडिक असलं (सायट्रिक ऍसिड) तरी ते शरीरात गेल्यावर मात्र अल्कलीन होतं. सर्दी, खोकला, ऍसिडिटी, मळमळ यावर लिंबू रामबाण उपाय आहे, तसेच बऱ्याच व्हायरल रोगांमध्ये सुद्धा लिंबू फायदेशीर आहे. लिंबामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदतच होते.

मो. 8208426494