वेस्‍टलाइफ फूडवर्ल्‍डचे व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून सौरभ कालरा नियुक्‍त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

वेस्‍टलाइफ फूडवर्ल्‍ड लि. (Westlife Foodworld Ltd.) (पूर्वीची वेस्‍टलाइफ डेव्‍हलपमेंट लि.) या पश्चिम व दक्षिण भारतातील मॅकडोनाल्‍ड्स (McDonald’s) रेस्‍टॉरंट्सच्‍या मालक व ऑपरेटर कंपनीने सौरभ कालरा (Saurabh Kalra) यांची त्‍यांच्‍या सहयोगी कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) म्‍हणून नियुक्‍तीची घोषणा केली आहे. यापूर्वी सौरभ कंपनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीओओ) होते. या नवीन पदासह सौरभ एकूण व्‍यवसाय धोरण व विकास संधींवर लक्ष केंद्रित करतील, कंपनीच्‍या दीर्घकालीन यशाला चालना देतील, तसेच दैनंदिन कार्यसंचालनांमध्‍ये सखोलपणे सक्रिय राहतील.

सौरभ यांना वेस्‍टलाइफसेाबतच्‍या त्‍यांच्‍या वीस वर्षांहून अधिक करिअर कालावधीमध्‍ये संपन्‍न अनुभव व ज्ञान आहे. २००२ मध्‍ये व्‍यवस्‍थापन प्रशिक्षणार्थी म्‍हणून करिअरची सुरूवात केलेले सौरभ तरूण रेस्‍टॉरंट मॅनेजर्सपैकी एक बनले. वर्षानुवर्षे त्‍यांनी कार्यसंचालने, प्रशिक्षण, रिअल इस्‍टेट, धोरण व विकास कार्यांमध्‍ये भूमिका बजावल्‍या. हळूहळू व यशस्‍वीरित्‍या रेस्‍टॉरंट-फेसिंग पदावरून सीएक्‍सओ पदामध्‍ये बदलले. भारतात मॅककॅफे व एक्‍स्‍पेरिअन्‍स ऑफ द फ्यूचर (ईओटीएफ) रेस्‍टॉरंट्स लाँच व विकसित करण्‍यामध्‍ये सौरभ यांचा मोलाचा वाटा होता. ते दक्षिण भारतात मॅकडोनाल्‍ड्स ब्रॅण्‍ड स्‍थापित केलेल्‍या ब्रॅण्‍डचा अविभाज्‍य भाग देखील होते.

Leave A Reply

Your email address will not be published.