Sunday, November 27, 2022

जनतेचा रास्ता रोको… महापौरांचे आश्वासन…!

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

- Advertisement -

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरातील मुख्य रस्ता त्याचबरोबर परिसरातील रस्त्यांची गेल्या चार वर्षांपासून समस्या निर्माण झाली होती. यासाठी येथील नागरिकांनी इंद्रप्रस्थ नगर येथून मोर्चा काढून एस.के.ऑईल मिल जवळील मुख्य चौकात रस्ता रोको करून महापालिका प्रशासनाचा व नगरसेवकांचा निषेध नोंदविला.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरात रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागिरकांनी नेहमी महापौर व आयुक्त यांना निवेदन व त्याचा पाठपुरावाही केला, परंतु कुठलेही नियोजन मनपा प्रशासन करीत नसल्याने नागरिकांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको सुरु असताना त्याठिकाणी शहर पोलीस पथकही दाखल झाले होते. नागरिकांच्या संतप्त भावना पोलीस प्रशासनाने एकूण घेत, त्यानंतर महापौर जयश्री महाजन या आंदोलनस्थळी दाखल झाल्या आणि आश्वासन देत हे आंदोलन तूर्तास मागे घेण्याचे सांगितले.

दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या उड्डाणपुलासंदर्भांत नागरिकांनी महापौर महाजन यांना विचारले असता महापौर यांनी लागलीच ठेकेदाराला फोन करून हे काम त्वरित सुरु करण्याची विनंती करत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. महापौर महाजन संपूर्ण प्रभागाची पाहणी करत असतांना के.सी पार्क परिसरातील नागरिकांनी महापौरांना घेराव घातला होता.

आकाश जाधव, विजय सुरवाडे, संदीप महाले, दीपक झुंझारराव, नितीन मोरे, अतुल शिरसाळे, स्वामी पोतदार,  महेश ठाकूर,  अमर लोखंडे, नारायण कोळी,  कुमार निकम, राजू मोरे, बंटी सोनवणे, भूषण राऊत , लक्षिमकांत तिवारी, चंद्रमणी मोरे यांच्यासह परिसरातील शेकडो जबाबदार नागरिक आंदोलनात उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या